बदनामी लपवण्यासाठी महाविकास आघाडीकडून खोटे आरोप; कर्डिले समर्थकांची टीका

पंचायत समितीचा माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी महिलेवरील अत्याचार प्रकारणामुळे नगर तालुका महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यांची अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहे. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाचक्की झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे.

    जेऊर : पंचायत समितीचा माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी महिलेवरील अत्याचार प्रकारणामुळे नगर तालुका महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यांची अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहे. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाचक्की झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे.
    माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी आघाडीच्या नेत्यांनी मोकाटेची व्हिडिओ क्लिप बारकाईन पाहावी, विश्वास नसेल तर त्याचे सरकार आहे. सरकारी यंत्रणेकडून तपासून घ्यावी, असे आवाहन कर्डिले समर्थकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले.
    कोणी काय केले, कसे व्यभिचार केले काय कुटाने केले,  हे जेऊर गटातील लोकांना आणि नगर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांना समजले आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आणि फिर्यादी कोण हे पोलीस रेकॉर्ड वर आहे. त्यांचा आणि माजी आमदार कर्डीले यांचा कोठेही संबंध नाही. हे सर्व खोटं बनावट आहे असे महाआघाडी म्हणते तर फरार होण्याची गरज का पडली.
    महाविकास आघाडीमधील या लोकांनी नगर तालुक्याची प्रतिमा घालवली. झालेल्या घाणेरड्या प्रकरणाने जेऊर गटाची बदनामी झाली. नगर तालुक्याची बदनामी झाली. घटना झाल्यानंतर महाआघाडीला माजी मंत्री कर्डीले यांच्यावर आरोप करण्याची आठवण झाली. कारण गेल्या १० ते १५ दिवसात महाआघाडीचे लोक तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले, त्या-त्या ठिकाणी त्यांना लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्यावरील लोकांचा राग. संताप कमी होण्यासाठी कर्डीले यांच्यावर खोटे आरोप केला जात आहेत. आरोप करताना त्यांनी काही पुरावें का दिले नाहीत ? चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत.