आधी ऊस पेटविला आणि मग शेतातच… ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने असा निर्णय घेतला की होत्याचे नव्हते झाले

जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे(Farmer commits suicide after Burning Sugarcane in Beed).

    बीड : जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे(Farmer commits suicide after Burning Sugarcane in Beed).

    नामदेव आसाराम जाधव रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नामदेव जाधव यांच्याकडे एकूण दोन एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये २६५ जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र, हा ऊस आता तोडणीला येऊन देखील परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हत.

    गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी नामदेव जाधव हे कारखान्याकडे फेऱ्या मारत होते. मात्र, त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली. त्यामुळे नैराश्यात असलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.