परभणी: एवढे टोकाचे पाऊल उचलायला नको होते; आधी बायकोची गळा दाबून हत्या केली मग स्वत: गळफास घेऊन जीव दिला

डोक्यावरील कर्जामुळे कंटाळलेल्या पालमच्या एका शेतकऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील पूयणी या गावात 45 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रंगनाथ शिंदे अशी मृत शेतकऱ्याचे नाव आहे(Farmer commits suicide after killing his wife in Parbhani).

    परभणी : डोक्यावरील कर्जामुळे कंटाळलेल्या पालमच्या एका शेतकऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील पूयणी या गावात 45 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रंगनाथ शिंदे अशी मृत शेतकऱ्याचे नाव आहे(Farmer commits suicide after killing his wife in Parbhani).

    निसर्ग कोपल्याने यंदा सोयाबीन, तूर आणि मूग हातातून गेली. त्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत रंगनाथ यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सविता रंगनाथ शिंदे (36) या गाढ झोपेत असताना त्याचा गळा दाबून हत्या केली. नंतर सुताच्या दोरीने लाकडी तुळस दोरी बांधून स्वतःची जीवन यात्रा संपवली.

    रंगनाथ शिंदे यांना चार एकर जमीन असून, त्यांच्या पश्चात दोन मुले आहे. दरम्यान, रंगनाथ शिंदे यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलायला नको होते, अशा भवना पंचक्रोशीत व्यक्त होत आहेत.

    हे सुद्धा वाचा
    • 2022