पेनूर येथील शेतकरी रणदिवे यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

शेतातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून पाण्याची चारी मधोमध काढून दिल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विहिर ढासळत आहे. याचा पंचनामा करून नुकसानभरपाई त्वरित मिळावी, यासह दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, यासाठी पेनूर येथील शेतकरी मारुती सुदाम रणदिवे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेतातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून पाण्याची चारी मधोमध काढून दिल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विहिर ढासळत आहे. याचा पंचनामा करून नुकसानभरपाई त्वरित मिळावी, यासह दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, यासाठी पेनूर येथील शेतकरी मारुती सुदाम रणदिवे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.

    मोहोळ येथील तहसील कार्यालयासमोर मारुती सुदाम रणदिवे यांनी २२ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण केले असून, त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करून त्यांच्या शेजारील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून शेताच्या मधोमध चारी काढून दिल्यामुळे शेतातील पिक, विहीर व बोअर यांचे नुकसान झाले.

    याबाबत मंडल अधिकारी यांनी दिलेला चुकीचा अहवाल दुरुस्त करून नुकसानभरपाईबाबत पंचनामा करावा, यासह दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सचिन रणदिवे, समाधान रणदिवे सहभागी झाले आहेत.