शेतकऱ्याची आत्महत्या; अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे

    नागपूर (Nagpur) :  व्याजासाठी होणारा छळ असह्य झाल्यानेच शेतकरी शहाजी जनार्दन राऊत (वय ६०, रा. मालापूर) यांनी आत्महत्या केल्याचे तपासादरम्यान समोर आले. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी दोन अवैध सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

    सुमित चांडक व सुरेंद्र ठाकेर, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहाजी यांनी शेतात लागवडीसाठी दोघांकडून व्याजाने पैसे घेतले. त्यांनी पैसे परत केले. त्यानंतरही ते दोघे त्यांचा व्याजासाठी छळ करायला लागले.

    छळ असह्य झाल्याने २७ ऑक्टोबर रोजी शहाजी यांनी विष प्राशन केले. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान दोघांच्या छळाला कंटाळूनच शहाजी यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.