Booked a helicopter as I wanted to eat burgers

भारतात वेगवेगळी मंदिरे आहेत. या मंदिरांचे बांधकाम, त्यांची शैली, त्यावरील कोरिव काम असा वेगळा इतिहासही आहे. भारताच्या प्रत्येक गावात, शहरात त्या त्या देव देवतांची, ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. या प्रत्येक देवांना वेगवेगळा नैवैद्य चढवला जातो आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तो प्रसाद म्हणून दिला जातो. त्यामुळे भारताच्या प्रत्येक मंदिरात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद मिळतील. शुद्ध तुपातले लाडू, मोदक, पेढे, पेठा, हलवा, खीर, खिचडी आणि बरचे काहिसे.. त्यातून दक्षिणेकडच्या मंदिरात गेलात तर पोंगल किंवा पायसम हे पदार्थ प्रसाद म्हणून ठरलेलेच असतात. पण दक्षिणेकडील एका मंदिरात या पदार्थांऐवजी चक्क फास्ट फूडच प्रसाद म्हणून वाटले जाते(Fast food is available as prasad in this temple).

    चेन्नई : भारतात वेगवेगळी मंदिरे आहेत. या मंदिरांचे बांधकाम, त्यांची शैली, त्यावरील कोरिव काम असा वेगळा इतिहासही आहे. भारताच्या प्रत्येक गावात, शहरात त्या त्या देव देवतांची, ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. या प्रत्येक देवांना वेगवेगळा नैवैद्य चढवला जातो आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तो प्रसाद म्हणून दिला जातो. त्यामुळे भारताच्या प्रत्येक मंदिरात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद मिळतील. शुद्ध तुपातले लाडू, मोदक, पेढे, पेठा, हलवा, खीर, खिचडी आणि बरचे काहिसे.. त्यातून दक्षिणेकडच्या मंदिरात गेलात तर पोंगल किंवा पायसम हे पदार्थ प्रसाद म्हणून ठरलेलेच असतात. पण दक्षिणेकडील एका मंदिरात या पदार्थांऐवजी चक्क फास्ट फूडच प्रसाद म्हणून वाटले जाते(Fast food is available as prasad in this temple).

    चेन्नईमधल्या जया दुर्गा पीठात भक्तांना प्रसाद म्हणून ब्राऊनी, बर्गर, सँडविच, चेरी टॉमेटो सॅलॅड दिले जात आहे. ‘जे अन्न सकस असते आणि चांगल्या मनाने बनवले जाते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायला काय हरकत आहे, मग ते पारंपारिक पदार्थ असो किंवा फास्ट फूड” असेही मंदिरातल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.

    या मंदिरातला प्रसादच त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अनेक भक्त येथे प्रसादासाठी येतात असेही त्यांनी सांगितले. तसेच या मंदिरात केकही तयार केले जात आहे. वाढदिवासाच्या दिवशी अनेक भक्त मंदिरात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी खास केकही तयार करण्यात येतात. बाकीच्यांचे माहीत नाही पण इथल्या स्थानिकांना मात्र हा हटके प्रसाद आवडू लागला आहे.