लेकीच्या मृत्युनंतर तिला न्याय देण्यासाठी झटतोय बाप, 42 दिवसापासून अंत्यसंस्कार केले नाहीत!

हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यावर पोलीस अधीक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात फेरशवविच्छेदन करण्याच्या सूचना देखील त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहेत.

    नंदुरबार : आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी एक बाप गेल्या 42 दिवसापासून झटत आहे. तिच्या मृत्यूला एक महिन्याच्या वर काळ उलटून गेला तरीही तिच्यावर अंत्यसंस्कार न करत तिचा मृतदेह मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर अत्याचारप करून तिचा खून (Murder) केल्याचा आरोप करत तिचं पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

    नंदुरबारच्या धडगाव खडक्या गावातुन ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रहिवासी आंतरसिंग काल्या वळवी यांची विवाहीत मुलगी रंजिलासोबत हा दुर्देवी प्रकार घडला आहे. 01 ऑगस्ट ला ही रंजिला शेतात गेली असताना काही जणांनी तिच्यासोबत गैरप्रकार केला. आपल्यावर रणजीतसह चार जण अत्याचार करत असून मला मारुन टाकतील, असंही रंजिलाने फोनवरुन नातेवाईकाला सांगितलं. त्यानंतर काही वेळातच रंजिलाने वावी इथल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. याबाबत पोलिसांत तक्रार करुन पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. तिच्यावर अत्याचर झाला असून तिला फाशी देण्यात आली असून पोलिसांच्या मदतीने ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडिलांसह कुटुबीयांनी केला आहे. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यावर पोलीस अधीक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात फेरशवविच्छेदन करण्याच्या सूचना देखील त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहेत.