तळेगाव ढमढेरेत घराशेजारील झाड तोडल्याने दोन गटांत हाणामारी

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील कमेवाडी या ठिकाणी घराशेजारील बाभळीचे झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली.

    शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील कमेवाडी या ठिकाणी घराशेजारील बाभळीचे झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजाराम दत्तात्रय भुजबळ, मंगेश राजाराम भुजबळ, ऋषिकेश अवधूत भुजबळ, मीना अवधूत भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर अवधूत भुजबळ यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील कमेवाडीमध्ये राहणारे मंगेश भुजबळ यांनी त्यांच्या घराशेजारील झाड तोडले. यावेळी ऋषिकेश भुजबळ यांनी तोडलेले झाड आमच्या इकडे टाकू नका, असे म्हटल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यांनतर वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी दोघा गटांनी कुऱ्हाड घेऊन त्याने मारहाण केल्याने घडलेल्या घटनेत मीना भुजबळ व मंगेश भुजबळ हे दोघे जखमी झाले आहेत.

    याबाबत दोन्ही गटांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजाराम दत्तात्रय भुजबळ, मंगेश राजाराम भुजबळ, ऋषिकेश अवधूत भुजबळ, मीना अवधूत भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर अवधूत भुजबळ यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश माने हे करत आहे.