झेडपीच्या ‘त्या’ कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ;  रासपची निवेदनद्वारा मागणी

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनशी संलग्न कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांवर ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करा आशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनशी संलग्न कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांवर ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करा आशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे

    याबाबत जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे म्हणाले की, झेडपीत भ्रष्टकारभार होत असून दोन लाचप्रतिबंध विभागाच्या मोठया कारवाईया झाल्या आहेत. भ्रष्टकारभारावर आळा घालण्यासाठी सीईओ दिलीप स्वामी यांनी २० कर्मचाऱ्यांची पंचायात समितीस्तरावर बदली न करता मुख्यालयातंर्गत बदली केली आहे.ही बदली प्रक्रिया कर्मचारी युनियन आणि संलग्न कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करायला हवे होते. मात्र त्या २० कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया खापर प्रसार माध्यम आणि जिल्ह्यातील सामाजीक संघटनेवर फोडले आहे. वास्तवीक पाहता बदली धोरणात प्रसारमाध्यम आणि सामाजीक संघटनेचा हस्तक्षेप नाही. सीईओ दिलीप स्वामी यांनी केलेल्या बदल्या पारदर्शक आहेत.
    दरम्यान युनियन आज काळ्याफिती लावून कामकाज करण्याचे जाहीर केले होते. प्रशासनाने बदल्या नियमानुसार झाल्याचे जाहीर केल्याने आजचे आंदोलन रध्द करण्यात आले.