Filled the world with eight different passports; Underworld don Suresh Pujari, who has been absconding for 15 years, finally arrested

फिलिपाईन्सवरून भारतात आणण्यात आलेला कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याची आयबीसह इतर तपास संस्थांनी कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुजारी याच्याविरोधात खंडणीचे असंख्य गुन्हे दाखल आहेत(Filled the world with eight different passports; Underworld don Suresh Pujari, who has been absconding for 15 years, finally arrested).

    मुंबई :  फिलिपाईन्सवरून भारतात आणण्यात आलेला कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याची आयबीसह इतर तपास संस्थांनी कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुजारी याच्याविरोधात खंडणीचे असंख्य गुन्हे दाखल आहेत(Filled the world with eight different passports; Underworld don Suresh Pujari, who has been absconding for 15 years, finally arrested).

    एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा सुरेश पुजारी हा खास हस्तक होता. मात्र नंतर त्याने त्याची साथ सोडून स्वतःची टोळी तयार केली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली तसेच इतर उपनगरात आणि कर्नाटकात सुरेशच्या विरोधात कित्येक गुन्हे दाखल आहेत. 15 ऑक्टोबर रोजी सुरेशला इंटरपोलने फिलिपाईन्समध्ये अटक केली होती. त्यानंतर दीड महिन्याने त्याला भारतात आणण्यात आले आहे. दरम्यान, फिलिपाइन्समधून प्रत्यार्पण केल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा भारतात आणलेल्या गँगस्टर सुरेश पुजारीला बुधवारी एटीएसनेमुंबईत आणले.

    आठ वेगवेगळ्या नावाने पासपोर्ट

    पुजारीने आठ वेगवेगळ्या नावाने सुरेश पुजारी याने पासपोर्ट बनविलेला होता. त्याच्या आधारे तपास संस्थांना चकमा देत तो जगभरात प्रवास करीत असे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी सुरेश पुजारीच्या विरोधात क्रमश: 2017 आणि 2018 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. गेल्या 15 वर्षांपासून पुजारी फरार होता. पुजारीपासून त्याने 2007 साली फारकत घेतली होती. त्यानंतर तो विदेशात पळाला होता.