voter

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, मंगळवार २१ डिसेंबर रोजी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.

    शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची (Nagar Panchayat Election) प्रक्रिया सुरू झाली असून, मंगळवार २१ डिसेंबर रोजी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.

    प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावर आलेल्या हरकतीवर सुनावणी होऊन अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये नगरपंचायत सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२१ च्या निवडणूक कार्यक्रमाचे टप्पे याप्रमाणे असून सोमवारी (दि.२९) अंतिम प्रभागनिहाय मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंगळवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जारी करतील. त्यानंतर १ डिसेंबर २०२१ सकाळी ११ ते मंगळवार दि. ७ डिसेंबर २०२१ दुपारी २ वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्याकरिताचा कालावधी असणार आहे.

    ८ डिसेंबर सकाळी ११ वाजेनंतर दाखल असलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १३ डिसेंबरला ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठीची मुदत आहे. नामनिर्देशन पत्रासंदर्भात अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल.

    तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचित केले आहे. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिर्सया दिवशी किंवा तत्पूर्वी गुरुवार दि. १६ डिसेंबर २०२१ पर्यंत याबाबत प्रक्रिया करणे गरजेचे आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दुर्सया दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविर्णाया उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.