अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान पॅन कार्डच्या वापराबाबत मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पॅनला एक सामान्य व्यवसाय ओळखकर्ता बनवले जाईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान पॅन कार्डच्या वापराबाबत मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पॅनला एक सामान्य व्यवसाय ओळखकर्ता बनवले जाईल.
म्हणजेच सर्व व्यवहारांमध्ये पॅनचा वापर केला जाईल. जर तुम्हाला त्याचा डिजिटल पेमेंटमध्ये वापर करायचा असेल तर तुम्हाला पॅन नंबर द्यावा लागेल. याशिवाय UPI अॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी पॅन वापरणे आवश्यक असेल. याशिवाय तुम्ही UPI अॅपवर लॉग इन करू शकणार नाही. तुम्हाला सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे.
व्यवसाय सुरू करणे होणार सोपे
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन हा मुख्य आधार बनवला जाईल. म्हणजेच, जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे आधीपासूनच पॅन क्रमांक असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही व्यवसाय सुरू करू शकणार नाही.
का वाढला वापर
डिजिटल व्यवहार वाढल्याने करचोरी थांबल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे असतानाही करचोरी सुरू आहे. हे रोखण्यासाठी आता पॅनची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. पॅनशी लिंक केल्याने कोणालाही कर चुकवणे कठीण होईल.