५ हजार रुपयांसाठी पत्नीला दोघांना विकलं, नंतर त्या दोघांनी पतीसमोरच केला तिच्यावर बलात्कार!

पीडित महिला मालपुरा गेट परिसरातच चहा बनवते. एफआयआरनुसार, १९ डिसेंबर रोजी पीडितेच्या पतीने दोन मित्रांना सोबत आणले, ज्यांच्यासोबत त्याने ५,००० रुपयांचा सौदा केला होता. पतीने पीडितेला काही दिवस मित्रांकडे राहण्यास सांगितले. पीडितेने विरोध केला असता पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तीला जबरदस्तीने पकडून रेडीच्या मागे नेण्यात आले. त्याचवेळी दोन्ही मित्रांनी पतीसमोर सामूहिक बलात्कार केला आणि पीडितेला बेदम मारहाण केली. यादरम्यान पीडितेचा मुलगाही घटनास्थळी पोहोचला. त्याने विरोध केला असता दोघांनी त्यालाही मारहाण केली.

  राजस्थान : जयपूरमधील मालपुरा गेट पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीने पत्नीचा ५ हजार रुपयांना सौदा करून तिला दोन तरुणांच्या ताब्यात दिल्याचा आरोप आहे. तरुणांनी पतीसमोर पत्नीला मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान पीडितेचा मुलगा तेथे आला आणि त्याने विरोध केला असता त्याला मारहाण केली. याप्रकरणी पीडित महिलेने मालपुरा पोलिस ठाण्यात पती आणि दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, पीडित महिला मालपुरा गेट परिसरातच चहा बनवते. एफआयआरनुसार, १९ डिसेंबर रोजी पीडितेच्या पतीने दोन मित्रांना सोबत आणले, ज्यांच्यासोबत त्याने ५,००० रुपयांचा सौदा केला होता. पतीने पीडितेला काही दिवस मित्रांकडे राहण्यास सांगितले. पीडितेने विरोध केला असता पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तीला जबरदस्तीने पकडून रेडीच्या मागे नेण्यात आले. त्याचवेळी दोन्ही मित्रांनी पतीसमोर सामूहिक बलात्कार केला आणि पीडितेला बेदम मारहाण केली.

  यादरम्यान पीडितेचा मुलगाही घटनास्थळी पोहोचला. त्याने विरोध केला असता दोघांनी त्यालाही मारहाण केली. पीडितेने आणि तिच्या मुलाने आरडाओरड केला तेव्हा लोक जमा होऊ लागले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.

  पोलीस काय म्हणाले?

  घटनेच्या दोन दिवसांनंतर पीडित महिला आणि तिचा मुलाने मालपुरा गेट पोलीस ठाणे गाठले. पीडितेने पतीसह अन्य दोन आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मालपुरा पोलिस स्टेशनचे अधिकारी रईसल सिंह यांनी दैनिक भास्करला सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून विशेष पथक आरोपींचा शोध घेत आहे. घटनेला ७ दिवस उलटून गेले, अहवाल लिहून ५ दिवस उलटले तरी अद्याप एकही आरोपी ताब्यात घेण्यात आलेला नाही.