नागपुरात थंडीचा पहिला बळी ; ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

उपराजधानीत थंडीमुळे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी जागनाथ बुधवारी परिसरात ज्येष्ठ नागरिक बेशुद्ध अवस्थेत आढळला.

    नागपूर (Nagpur) :  उपराजधानीत थंडीमुळे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी जागनाथ बुधवारी परिसरात ज्येष्ठ नागरिक बेशुद्ध अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ज्येष्ठ नागरिकाला मृत घोषित केले.

    मृतकाची ओळख पटलेली नाही. थंडीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरचे तापमान घटले आहे.