बालाजीच्या दर्शनाला चालले होते 5 मित्र, कारचं झालं स्मशान, कटरनं कापून काढावे लागले मृतदेह

पघातात मृत्युमुखी पडलेले पाचही जण एकमेकांचे मित्र होते. मृत अजयला अनेके वर्षांनी मुल झाले होते. त्यानंतर ४० दिवसांनी नवस फेडण्यासाठी सालासारला जात होते. बालाजीच्या दर्शनाआधीच या पाचही मित्रांवर काळानं घाला घातला.

  सीकर- मुलगा झाला म्हणून मित्रांसह नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या कारला झालेल्या भीषण अपघातात (Car Accident)पाच जणांचा मृत्यू झालाय. राजस्थानात फतेहपूर परिसरात झालेल्या या दुर्घटनेत बालपणापासून मित्र असलेल्या पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात इतका भयंकर होता की त्यांचे मृतदेह या कारमध्येच अडकून पडले होते. एखाद्या खेळण्यातल्या गाडीप्रमाणे ही गाडी पिचकली होती. नंतर अक्षरश: पोलिसांनी कटरच्या माध्यमातून गाडीचे भाग कापले आणि मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.

  पोलिसांनाही थंडीत फुटला घाम

  अपघात इतका भयंकर होता की, पाचही मित्रांना घटनास्थळी मृत्यू झाला होता. कटरने मृतदेह काढताना कुणाचा हात तुटल्याचं, कुणाची मान तुटल्याचं दिसतं होतं. मृतदेह बाहेर काढणाऱ्या पोलिसांनाही त्यांची अवस्था पाहून कडाक्याच्या थंडीत घाम फुटला होता. आता स्थिती अशी आहे की चादरीत झाकून हे मृतदेह शवागरात ठेवण्यात आले आहेत.

  नेमकं काय घडलं ?

  हरियाणात राहणारे पाच मित्र अजय, अमित, संदीप, मोहनलाल आणि दुसरा एक संदीप हे पाचही जण जात असताना हा अपघात झाला. हे सर्वजण हरियाणातील फतेहाबाद पिरसरातील रहिवासी होते. ते प्रवास करत असलेल्या रस्त्यावर डिव्हायडर नव्हते. रविवारी रात्री उशिरा या कारला ट्रकनं धडक दिली. कार समोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी समोरुन वेगानं येत असलेल्या ट्रकनं ही कार उडवली. कारची गती जास्त असल्यानं अपघात जबरदस्त झाला. कारचं इंजिनचं उडालं आणि ते कारमध्ये बसलेल्यांना जाऊन आदळलं. कुठल्यातरी मोठ्या वस्तूनं कारवर हातोडा मारल्यासारखी कारची स्थिती झाली होती. या कार आणि ट्रेकला एकमेकांपासून विलग करण्यासाठी अडीच तास लागले. या काळात हायवेवर वाहनांची कोंडी झाली होती.

  नवस फेडण्यासाठी जात होते

  अपघातानंतर याची माहिती संबंधितांच्या नातेवाईकांना कळवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. अपघातात मृत्युमुखी पडलेले पाचही जण एकमेकांचे मित्र होते. मृत अजयला अनेके वर्षांनी मुल झाले होते. त्यानंतर ४० दिवसांनी नवस फेडण्यासाठी सालासारला जात होते. बालाजीच्या दर्शनाआधीच या पाचही मित्रांवर काळानं घाला घातला.