Flight takeoff from Gondia's Birsi Airport after 79 years! Benefit passengers from Maharashtra and neighboring Madhya Pradesh, Chhattisgarh

  गोंदिया : गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून तब्बल ७९ वर्षांनंतर आज प्रवासी वाहतूक विमान सेवेला सुरवात झाली. याचे उद्घाटन नागरी उड्डयण मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंदोर येथून करण्यात आले. तर गोंदिया ते हैदराबाद या विमान सेवेला गोंदिया विमानतळावरून खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला(Flight takeoff from Gondia’s Birsi Airport after 79 Years! Benefit passengers from Maharashtra and neighboring Madhya Pradesh, Chhattisgarh).

  पहिल्याच दिवशी या ७२ सीटर विमानात ६५ लोकांनी या विमान सेवेचा लाभ घेतला. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते २००८ मध्ये या अत्याधुनिक विमानतळाची निर्मिती करण्यात आली. स्वतः जोतिरादित्य सिंधिया आणि खासदार सुनील मेंढे यांनी देखील या उद्घाटनाप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला. प्रफुल्ल पटेलांच्या स्वप्नांमुळेच उशिरा का होईना आज गोंदियाकरांना प्रथमच या विमानतळाचा लाभ घेता आला.

  गोंदिया शहराला लागून असेलल्या बिरसी गावात ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२-४३ साली बिरसी विमानतळाची उभारणी केली होती. मात्र स्वातंत्र्याआधी हा विमानतळ पूर्णतः नाहिसा झाला. २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. तब्बल ७९ वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस आज प्रारंभ झाला आहे.

  आजपासून वेळापत्रकानुसार सेवा

  फ्लायबिग कंपनीचे प्रवासी विमान इंदोर विमानतळावरून सकाळी ९.३० सुटेल. गोंदिया विमानतळावर सकाळी १०.४५ वाजता पोहोचेल. तर हैदराबादसाठी १ वाजता उड्डाण भरले. त्यानंतर सोमवारपासून वेळापत्रकानुसार नियमित विमानसेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे.

  भविष्यात शेती मालाची वाहतूक होणार

  शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार आहे. इंदोर ते गोंदिया पहिला प्रवासी गोपाल अग्रवाल, करिश्मा जैन यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील मेंढे यांचे आभार मानले. लवकरच गोंदिया ते मुंबई-पुणे अशी विमान सेवा सुरू करणार असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली.