फ्लीपकार्टचा आयपीओ येणार; गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता

फ्लीपकार्टचा व्यवसाय आमच्या अपेक्षेप्रमाणेच उत्तम चालला असून लवकरच आयपीओ सादरीकरणाला वेग देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    दिल्ली, फ्लीपकार्ट या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ (Flipkart IPO) लवकरच आणला जाणार असल्याची माहिती वॉलमार्टचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य वित्त अधिकारी ब्रेट बिग्गज यांनी दिली आहे. फ्लीपकार्ट ही वॉलमार्टच्या मालकीची कंपनी आहे. सदरच्या आयपीओ सादरीकरणासाठी निश्चित अशी कालमर्यादा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    फ्लीपकार्टचा व्यवसाय आमच्या अपेक्षेप्रमाणेच उत्तम चालला असून लवकरच आयपीओ सादरीकरणाला वेग देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.