chandrababu naidu

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना काल मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. कोणत्या कारणासाठी कारवाई? ही कारवाई सीआयडीने केली आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरन्ट जारी करण्यात आले होते.

    आंध्र प्रदेश – देशाच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी व खळबळजनक बातमी समोर येत आहे. तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना काल मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. कोणत्या कारणासाठी कारवाई? ही कारवाई सीआयडीने केली आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरन्ट जारी करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. ( Former Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu Arrested; Action for what reason)

    कोणत्या कारणासाठी अटक?
    दरम्यान, नायडू यांच्यावर स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा (Skill Development Scam Case) केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं (CID) नायडू यांच्यावर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नांदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा नांदयाल येथील आरके फंक्शन हॉल परिसरात दाखल झाला होता.