Gang rape on woman just before International Women's Day! The victim was with the married woman and her husband.

या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी चौघांनाही अटक केली. सर्व आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

    मुंबई : कुर्ला परिसरात 19 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या नातेवाईकांनी पैशासाठी तिच्यावर बलात्कार घडवून आणल्याची घटना तपासात समोर आली आहे. या प्रकरणात चार आरोपींना मंगळवारी रात्री नेहरू नगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

    मुंबईत नोकरीच्या शोधात आलेल्या 19 वर्षीय विवाहितेवर मुंबईतील कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार करण्यात आला असून, नेहरूनगर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून 4 जणांना अटक केली आहे. या तिघांनीही बलात्कार करून कोणालाही सांगू नको असे पीडितेला सांगितले. मात्र, तीन महिन्यानंतर महिलेने याबाबत नेहरू नगर पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली आणि चार जणांना अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कोलकाता येथील मूळची रहिवासी आहे. ती दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आली होती. नोकरीच्या शोधात ही महिला मुंबईत आल्याची माहिती मिळते. तिचा मेहुणा तिला मुंबईत घेऊन आला होता. त्याने पीडितेला कुर्ला पूर्वेतील बर्मा सेल लाइन परिसरात झोपडीत राहणाऱ्या तिघांच्या हवाली केले होते. त्या बदल्यात त्याने पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली आहे.

    तीन महिन्यानंतर पीडितेने नेहरू नगर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपी मेहुणा, तसेच इतर तिघा आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी चौघांनाही अटक केली. सर्व आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.