
दुबईहून कल्याण येथे आलेले दोघे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहेत. 21 नोव्हेंबरला हे दोघे कल्याणमध्ये आले होते. दोघांचेही नमुने जिनोम सिक्वेंसिंगला पाठवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच नागपूरमध्येही दोन कोरोनाबाधित आढळले आहेत.
नागपूर, कल्याण (Nagpur, Kalyan) : COVID-19 third wave कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढत असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. कल्याणमध्ये दोघे तर नागपूर येथे दोघे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या चार जणांच्या जिनोम सिक्वेसिंग अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचे संकट कायम असल्याचे बोलले जात आहे. तर परदेशातून आलेल्या 30 जणांचा नागपुरात शोध घेण्यात येत आहे.
दुबईहून कल्याण येथे आलेले दोघे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहेत. 21 नोव्हेंबरला हे दोघे कल्याणमध्ये आले होते. दोघांचेही नमुने जिनोम सिक्वेंसिंगला पाठवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच नागपूरमध्येही दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. इंग्लंडहून परतलेल्या माय-लेकींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघींच्याही जिनोम सिक्वेसिंग अहवालाची प्रतिक्षा आहे. याबात जिल्हा आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
दरम्यान, परदेश परदेशातून नागपुरात आलेल्या 30 जणांचा अद्यापी शोध सुरूच आहे. नागपुरात परदेशातून आलेले दोघे जण आलेय पॉझिटिव्ह आढल्यानंतर चिंता वाढली आहे. तसेच 30 जण अद्याप सापडले नसल्याचे चिंतेत अधिक भर पडली आहे.