Big News! निलंगा-औसा मार्गावर भीषण अपघातात चारजण जागीच ठार; तीनजण जखमी, तर…

निलंगा-औसा मार्गावरील लातूरच्या दिशेनं येत असताना उत्का पाटी या भागात त्यांची कार पलटली. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

लातूर– मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघातांच्या (Accident) घटनात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आता लातूर (latur) जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर येत आहे. लातूरच्या निलंगा-औसा मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू ((Dead) झाला आहे. तर तीनजण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींना लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे काही काळ निलंगा-औसा मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला होता. तसेच यामुळं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सर्व अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे.

मृत्यामध्ये एकाच कुटुंबातील सगळे

दरम्यान, या अपघात मृत झालेले सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सचिन बडुरकर यांची दोन मुलं अमर (१५) व जय (१०), सचिन बडुरकर यांचा पुतण्या अंश किरण बडुरकर (१०) आणि सचिन बडुरकर यांचा मेव्हणा प्रकाश लक्ष्मण कांबळे (२७) यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील या सर्वांवर ही वेळ आल्यानं आणि काळानं घाला घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यामुळं झाला अपघात…

निलंगा-औसा मार्गावरील लातूरच्या दिशेनं येत असताना उत्का पाटी या भागात त्यांची कार पलटली. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. निलंग्याच्या दत्तनगर भागातील व्यावसायिक सचिन बडूरकर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत पुण्याहून निलंग्याला निघाले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.