Rs 600 per kg of tomatoes

मध्यप्रदेशातील जबलपूर येथे चेरी आणि द्राक्षांच्या आकाराच्या टोमॅटोची शेती केली जात आहे. या टोमॅटोंची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. या चेरी टोमॅटोची किंमत 400 ते 600 रुपये प्रति किलो एवढी आहे. या टोमॅटोंची दुबई आणि अमेरिकेमध्ये निर्यात केली जाते(Rs 600 per kg of tomatoes).

  जबलपूर : मध्यप्रदेशातील जबलपूर येथे चेरी आणि द्राक्षांच्या आकाराच्या टोमॅटोची शेती केली जात आहे. या टोमॅटोंची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. या चेरी टोमॅटोची किंमत 400 ते 600 रुपये प्रति किलो एवढी आहे. या टोमॅटोंची दुबई आणि अमेरिकेमध्ये निर्यात केली जाते(Rs 600 per kg of tomatoes).

  रुजवण्यासाठी खूप संशोधन

  जबलपूरमध्ये अंबिका पटेल हे शेतकरी अंबिका पटेल यांनी टोमॅटोच्या या प्रजातीचे जतन केले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून या टोमॅटोची शेती करत आहेत. त्याची विक्री मध्यप्रदेशमधील अनेक शहरांमध्ये केली जाते. पटेल यांनी सांगितले की, चेरी टोमॅटोची बी खूप लहान असते. त्यामुळे ट्रे आणि कोको पिटमध्ये ते उगवावे लागतात. तसेच त्याला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे लागते. अंबिका पटेल सांगतात की, जैविक पद्धतीने टोमॅटो रुजवण्यासाठी त्यांनी खूप संशोधन केले. रिसर्चमध्ये त्यांनी टोमॅटोच्या वेगवेगळ्या प्रजातींचा अभ्यास केला. त्यानंतर त्यामधील छोट्या चेरीसारख्या दिसणाऱ्या या टोमॅटोला सर्वात उपयुक्त पाहिले.

  स्वदेशी तंत्राने विकसित

  ते सांगतात की, आम्ही या टोमॅटोला हायब्रिड टोमॅटो किंवा स्वदेशी तंत्राने विकसित केलेला हाय व्हिटॅमिनयुक्त टोमॅटोही म्हणतो. उल्लेखनीय बाब म्हणजे पावसाळ्यामध्ये हा टोमॅटो पॉलिहाऊसमध्येही तयार करता येतो. टोमॅटोची आवक जेव्हा बंद होते. तेव्हा या टोमॅटोचा वापर वाढतो.

  पॅकिंगसुद्धा खास पद्धतीने

  या टोमॅटोची पॅकिंगसुद्धा खास पद्धतीने केली जाते. द्राक्षांप्रमाणे हे टोमॅटो पॅक केले जातात. तसेच त्यांची हाताळणी खूप खास पद्धतीने करावी लागते. आकाराने लहान असले तरी या टोमॅटोमध्ये मोठ्या टोमॅटोएवढाच आंबटपणा असतो. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिनचे प्रमाणही अधिक असते. उल्लेखनीय बाब म्हणजे चेरी टोमॅटोची शेती करणे हे काही कठीण काम नाही आहे. तर हे टोमॅटो कुठल्याही ट्रेमध्येही रुजवले जाऊ शकतात. पुरेसा ओलावा सिंचनासाठी ड्रॉप स्प्रिंकलिंकनेही याची शेती करता येऊ शकते. चेरी टोमॅटो घोसांमध्ये लागतो. तसेच त्याचे पॅकिंगसुद्धा द्राक्षांप्रमाणे केले जाते. निर्यात करण्यासाठी हे टोमॅटो थोडे कच्चे असतानाच तोडले जातात. पॉलीहाऊसमध्ये एका एकरामध्ये तब्बल २० टनपर्यंत चेरी टोमॅटोचे उत्पादन होऊ शकते.

  हे सुद्धा वाचा
  • 2022