धक्कादायक ! श्रीरामपूर तालुक्यात चार वर्षीय मुलीवर बलात्कार

चार वर्षीय मुलीला ती घरी एकटी असल्याचे पाहून घरातून उचलून नेले. त्यानंतर तुरीच्या शेतात भरदुपारी आरोपी सिकंदर शेख (वय ३२) या नराधमाने लहान मुलीवर बलात्कार केला. या घटनेने श्रीरामपूर तालुक्यासह पालकवर्गात खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस याप्रकरणी आरोपी शेखचा कसून शोध घेत आहेत.

    श्रीरामपूर : चार वर्षीय मुलीला ती घरी एकटी असल्याचे पाहून घरातून उचलून नेले. त्यानंतर तुरीच्या शेतात भरदुपारी आरोपी सिकंदर शेख (वय ३२) या नराधमाने लहान मुलीवर बलात्कार (Rape in Ahmednagar) केला. या घटनेने श्रीरामपूर तालुक्यासह पालकवर्गात खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस याप्रकरणी आरोपी शेखचा कसून शोध घेत आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या हद्दीत असलेल्या राहता तालुक्यातील जळगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 वर्षीय मुलीला ती एकटी असल्याचे पाहून गावात राहत असलेला आरोपी सिकंदर हुसेन शेख उर्फ कल्या याने मुलीला बळजबरीने उचलून नेऊन चौधरी यांच्या तुरीच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. भरदुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. भेदरलेल्या या मुलीने हंबरडा फोडत घडलेली घटना घरी सांगितली आणि हा भयंकर अत्याचाराचा प्रकार समोर आला.

    मुलीच्या नातेवाईक महिलेने श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या या नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपी राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुधकर साळवे यांनी भेट दिली. मदने हे पुढील करीत आहेत.