महावितरणचे उपठेकेदार म्हणून काम देण्याच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक

    पिंपरी : महावितरणचे वाशी, नवी मुंबई येथील काम उपठेकेदार म्हणून देण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यावसायिकाची 14 लाख 92 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2019 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडला.या

    अमोल देशपांडे (रा. कोथरूड, पुणे), हेमचंद्र कुरील (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र अशोक पाटील (वय 42, रा. कराड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी पाटील यांना महावितरणचे वाशी, नवी मुंबई येथील काम उपठेकेदार म्हणून देतो असे सांगितले. महावितरणला सिक्युरिटी डिपॉझिट देण्यासाठी पाटील यांच्याकडून 14 लाख 92 हजार 988 रुपये आरोपींनी घेतले. पाटील यांच्याकडून पैसे घेऊन आरोपींनी ते काम दुस-याच कंपनीला दिले. पाटील यांनी दिलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.