मला पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा; हसन मुश्रीफांचं वक्तव्य

अहमदनगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री पदावरून मला मुक्त करावं अशी इच्छा मी पाच महिन्यांपूर्वी केली होती, मात्र अजूनही मला मुक्त केलं नाही, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

    अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. सध्या राज्यात अनेक मंत्र्यांना स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले जात आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना देखील त्यांचा जिल्हा सोडून अहमदनगर जिल्हा देण्यात आला आहे.

    अहमदनगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री पदावरून मला मुक्त करावं अशी इच्छा मी पाच महिन्यांपूर्वी केली होती, मात्र अजूनही मला मुक्त केलं नाही, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

    दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. नगरचे पालकमंत्री पद का नको आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हसन मुश्रीफ यांनी पदावरून मुक्त करा, असं म्हणताना पुढे म्हणाले, पालकमंत्रिपदावरून मुक्त होईल त्यावेळी देखील नगरवर माझं तितकंच प्रेम राहील असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. जोपर्यंत आहे, तसेच तोपर्यंत प्रामाणिक काम करून तुमची सेवा करत राहील अस त्यांनी म्हटलंय.

    तर २६ जानेवारीला जर मी पालकमंत्री राहिलो तर झेंडा वंदनला येईल अस मुश्रीफ यांनी सांगितलय. त्यामुळे आता लवकरच नगरचे पालकमंत्री बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.