‘नर्सेस डे’ का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचा संपूर्ण इतिहास

आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्म याच दिवशी झाला. १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये तो दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून 'इंटरनॅशनल नर्सेस डे' म्हणून हा दिवस संपूर्ण जगात परिचित आहे.

  आत्तापर्यंत आपण अनेक ‘डेज्’ सेलिब्रेट केले असतील. ‘योगा डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘डॉक्टर्स डे’ यांसारखे डेज् आहेतच. पण त्याचबरोबर परिचारिकांसाठी म्हणजेच नर्सेससाठी ‘इंटरनॅशनल नर्सेस डे’ त्याला आपण जागतिक परिचारिका दिवसही म्हणता येते हा साजरा करत असतो. हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लॉरेन्स नायटिंगल यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. मात्र, हा दिवस दरवर्षी १२ मेलाच का येतो? हा दिवस साजरा करण्याचं कारण काय? त्याचं महत्त्व नेमकं काय? हे अनेकांना माहिती नसेल. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत…

  कोण होत्या फ्लॉरेन्स नायटिंगल?

  फ्लॉरेन्स नायटिंगल यांची आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर म्हणून प्रामुख्याने ओळख आहे. त्यांचा जन्म १२ मे १८२० रोजी इटलीच्या फ्लॉरेंस येथे झाला होता. त्या गणित आणि डाटामध्ये अत्यंत हुशार होत्या. याचाच वापर त्यांनी रुग्णांची सेवा करण्यासाठी अगदी योग्य पद्धतीने केला.

  १२ मे हाच दिवस ‘नर्सेस डे’ का?

  आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्म याच दिवशी झाला. १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये तो दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून ‘इंटरनॅशनल नर्सेस डे’ म्हणून हा दिवस संपूर्ण जगात परिचित आहे.

  पहिल्या परिचारिका म्हणून सन्मान

  फ्लॉरेन्स नायटिंगल यांनी पहिल्या परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा केली. त्यांनी नर्सिंग क्षेत्राला आधुनिक असे रुप दिले. त्यांचे रुग्णांप्रति असलेले प्रेम आणि आपुली आजही कुठं ना कुठं लेखी किंवा प्रतिमेच्या रुपात पाहिला मिळत आहे.

  कुटुंबीय नर्सिंग प्रवेशास नव्हते तयार

  फ्लॉरेन्स नायटिंगल यांनी जेव्हा त्यांच्या कुटुंबियांकडे नर्सिंगला अॅडमिशन घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यासाठी तयार नव्हते. मात्र, फ्लॉरेन्स यांच्या हट्ट आणि जिद्दीपुढे त्यांचे कुटुंबीय तयार झाले आणि त्यांनी फ्लॉरेन्स यांना वैद्यकीय शिक्षणासाठी जर्मनीला पाठवले.

  फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा ‘लॅम्प लेडी’ म्हणूनही गौरव

  १८५३ मध्ये क्रिमिअन युद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स नायटिंगल यांना तुर्कीच्या सैनिकी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. इथंच त्यांना रुग्णसेवेची पहिली संधी मिळाली होती. रात्र-रात्र जागून त्यांनी सैनिकांची सेवा केली होती. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हातात कंदिल घेऊन त्या सातत्याने जखमी रुग्णांची सुश्रुषा करत होत्या. त्यामुळे त्यांना ‘लॅम्प लेडी’ असेही म्हटले जाते.

  – कृपादान आवळे, पुणे