विदर्भात गडचिरोली सर्वांत गार; पारा 7.4 अंश सेल्सिअससह; थंडीच्या बाबतीत नागपूर दुसऱ्या क्रमांकावर

विदर्भातील सर्वाधिक गारठा होता. येत्या चार दिवसात प्रादेशिक हवामान खात्याने आणखी तापमानातघट होण्याची अंदाज व्यक्त केला आहे. आठवड्याभरापूर्वी ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी जोरदार परतली आहे.उत्तर भारतात झालेल्या हिमवर्षावामुळे ही थंडीची लाट आली आहे. दिवसही स्वेटर व मफलर घातल्याविना नागरिक घराबाहेर पडत नाही.

  नागपूर (Nagpur) :  नागपूर- ख्रिसमसपूर्वी विदर्भात थंडीची तीव्र लाट अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी नागपुरात 7.6 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आहे. नागपुरात यंदाचे हे सर्वांत नीचांकी तापमान आहे. तर विदर्भातील सर्वात कमी तापमान गडचिरोलीचे होते.

  विदर्भातील सर्वाधिक गारठा होता. येत्या चार दिवसात प्रादेशिक हवामान खात्याने आणखी तापमानातघट होण्याची अंदाज व्यक्त केला आहे. आठवड्याभरापूर्वी ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी जोरदार परतली आहे.उत्तर भारतात
  झालेल्या हिमवर्षावामुळे ही थंडीची लाट आली आहे. दिवसही स्वेटर व मफलर घातल्याविना नागरिक घराबाहेर पडत नाही. चहाच्या टप्प्यावर गर्दी बघायला मिळत आहे. सायंकाळपासून रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.

  येत्या चार दिवसात आणखी तापमान कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. .त्यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील चार दिवस थंडा थंडा कुल कुल असं वातावरण राहणार आहे.

  विदर्भात हुडहुडी
  जिल्हा अंश सेल्शिअस
  नागपूर – 7.6
  अमरावती- 7.7
  चंद्रपूर – 9.6,
  गडचिरोली– 7.4
  गोंदिया- 8.4
  वर्धा – 8.2
  यवतमाळ- 9.0

  लहानगे आणि वयोवृद्धांना सांभाळा
  थंडीचा कडाका वाढला असताना ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांसाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी खोकला होण्याची शक्यता आहे. गरम कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच थंडीपासून बचावासाठी कानटोपी आणि मफलरचा वापर आवश्यक आहे.