महराष्ट्रात दूध उत्पादन वाढविण्यासाठी गडकरी करणार आंदोलन

अॅग्रोव्हिजनच्या दुसऱ्या दिवशी 'विदर्भातील डेअरी व्यवसायाच्या संधी' या विषयावरील परिषद रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना गडकरींनी एनडीडीबी आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांच्या चांगलेच धारेवर धरले. विदर्भातील दूध उत्पादनवाढीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. एनडीडीबी तसेच मदर डेअरी यामध्ये पूर्णत: अपयशी ठरत असल्याचा ठपका ठेवत दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकारने दिलेले पैसेदेखील खर्च होत नसल्याबाद्दल गडकरींनी आश्चर्य व्यक्त केले.

    नागपूर (Nagpur) : ‘तुमचे अधिकारी काहीही काम करत नाहीत. दूध उत्पादन वढविण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नाहीत. राज्य सरकारने दिलेला पैसादेखील खर्च होत नसल्याचे चित्र आहे. तीन लाख लिटरच्यावर दुग्धउत्पादन गेलेले नाही. हे असेच सुरू राहिले तर मी स्वत: आंदोलन करील’, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीबीबी) आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांना दिला.

    अॅग्रोव्हिजनच्या दुसऱ्या दिवशी ‘विदर्भातील डेअरी व्यवसायाच्या संधी’ या विषयावरील परिषद रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना गडकरींनी एनडीडीबी आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांच्या चांगलेच धारेवर धरले. विदर्भातील दूध उत्पादनवाढीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. एनडीडीबी तसेच मदर डेअरी यामध्ये पूर्णत: अपयशी ठरत असल्याचा ठपका ठेवत दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकारने दिलेले पैसेदेखील खर्च होत नसल्याबाद्दल गडकरींनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या भाषणादरम्यान एनडीडीबीचे अध्यक्ष मीनेष शहा यांनी ‘काम कर रहे हैं’ असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अध्यक्षांच्या उत्तरावर आक्षेप नोंदवित ‘पिछले दो-तीन साल से मैं यही सुन रहा हूँ’ म्हणत गडकरींनी त्यांची बोलती बंद केली. मी जे म्हणतोय त्याची गंभीर दखल न घेतल्यास येत्या दोन महिन्यांत दिल्लीला कॅबिनेट मंत्र्यासोबत बैठक लावून तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडील, असा इशारा त्यांनी दिला. मदर डेअरी व एनडीबीबीकडून गडकरींना खूप आशा आहेत. त्यातूनच त्यांनी हा इशारा दिला असल्याचे बोलले जाते.

    करू कडक कारवाई!
    विदर्भातील दूध उत्पादन तीन लाख लिटरहून तीस लाख लिटरपर्यंत पोहचविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाने वीस लिटर दूध देऊ शकणारी गाय शक्य आहे. यामध्ये प्रशासनाने पुढाकार घ्यावा. विशेषत: एनडीडीबी आणि मदर डेअरीने गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल, अशी तंबी नितीन गडकरी यांनी भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात दिली.