अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; गर्भवती राहिल्याने समोर आला प्रकार

    चंद्रपूर (Chandrapur) : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

    मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला रूग्णालयात तपासणीसाठी नेले होते. तपासणीनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मुलगी गर्भवती असल्याचे कळताच मुलीच्या आईला धक्काच बसला. त्यानंतर आईने मुलीकडे चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने लगेचच पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरव ढवस, रोशन कष्ठी, मनोज पाल यांना अटक केली आहे.

    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, पिडीत मुलगी आणि सौरव ढवस हे शेजारी राहायचे. दोघांमध्ये मैत्री होती. मात्र, या मैत्रीचा फायदा घेत आरोपी सौरव गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. पिडीत मुलगी अन सौरवचे सबंध मित्राना माहीत होते. त्यांनी सौरव जवळ पिडीत तरुणीशी ओळख करुन देण्यासाठी हट्ट धरला. पिडीत तरुणीशी ओळख झाल्यानंतर सौरव आणि त्याच्या मित्रांनी पिडितेवर बळजबरी केली. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती.

    या घटनेनंतर पिडीतेच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी तीला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मुलीला विचारणा केली असता तीने आईला घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी लगेच पोंभुर्णा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी तिघाना अटक केली आहे. पुढील तपास पोस्को पथकातील निरीक्षक जयश्री रामटेके करीत आहेत.