सातवे पैकी शिंदेवाडीत गॅस्ट्रोचे थैमान; लहान बालिकेसह महिला दगावली

सातवे पैकी शिंदेवाडी येथे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना पाण्यामुळे त्रास जाणवत होता. तरी देखील पिणारे पाणी दूषित झाले आहे, याची शंका देखील कोणाला आली नसल्यामुळे अतिसाराने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे मिळेल त्या रुग्णालयात सोयीप्रमाणे उपचार घेत आहेत, असे समजते.

    वारणानगर : सातवे पैकी शिंदेवाडी ता. पन्हाळा येथील दूषित पाणी प्यायल्यामुळे लहान बालिकेसह एका महिलेला त्रास जाणवू लागला. येथे गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून, यामध्ये ऊस तोडणीचे काम करण्यास आलेल्या कुटुंबातील
    रितू सुरेश पावरा (४ रा.खांबाडी ता.शिरपूर जि.धुळे) या लहान बालिकेसह राजश्री राजेश पवार (वय ५० रा.चिपळूण) या महिलेचा अशा दोघींचा बळी या गॅस्ट्रोने घेतला. या घटनेने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, वेगवेगळ्या रूग्णालयात ११ रूग्ण उपचार घेत आहेत.

    सातवे पैकी शिंदेवाडी येथे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना पाण्यामुळे त्रास जाणवत होता. तरी देखील पिणारे पाणी दूषित झाले आहे, याची शंका देखील कोणाला आली नसल्यामुळे अतिसाराने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे मिळेल त्या रुग्णालयात सोयीप्रमाणे उपचार घेत आहेत, असे समजते. सोमवारी (दि.२७) रात्री रितू पावरा या चार वर्षांच्या मुलीचा पहिला बळी गेल्यावर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली तर मंगळवारी (दि.२८) राजश्री पवार (वय ५०) या महिलेचा उपचार सुरू असताना ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. गॅस्ट्रोने बळी गेलेली मुलगी व महिला ऊसतोड मजूरांच्या कुटुंबातील असल्याने या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.