प्रो डेडलिफ्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गिरीजेश रजकने पटकावले रौप्य पदक

या स्पर्धेमध्ये अनेक राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. जानेवारी मध्ये डेहरादून येथे होणाऱ्या एशिया कप मध्ये गिरीजेश रजक हिची निवड झाली आहे.

    कल्याण :- कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी परिसरातील गिरीजेश रजक या उच्च शिक्षित मध्यम वर्गीय युवतीने मुंढवा पुणे येथे झालेल्या प्राे डेडलिफ्ट चेपियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पदाकाची मानकरी आपल्या खेळातील कौशल्यवार प्राप्त केले. ९ ते १० डिसेंबर प्रिहँब १२१ फिटनेस मुंढवा पुणे येथे प्रो डेडलिफ्ट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कल्याणच्या स्कायआर्ट स्पोर्ट्सची गिरीजेश रजक हिने ६० किलो वजनाखालील गटामध्ये रौप्य पदक पटकावले. प्रो डेडल्फिट हा खेळ पाँवरलिफ्टिंग या प्रकारात येतो. या स्पर्धेमध्ये अनेक राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

    जानेवारी मध्ये डेहरादून येथे होणाऱ्या एशिया कप मध्ये गिरीजेश रजक हिची निवड झाली आहे. या खेळामध्ये गिरीजेशचे ट्रेनर विक्रांत साळवे यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. यानिमित्ताने विक्रांत यांनी सांगितले की, गिरीजेश ने प्रंचड मेहनत आणि सराव जिद्द या जोरावर यश मिळविले असून एशिया कप स्पर्धेसाठी तिची मेहनत सराव यासाठी तत्परता पाहता कामगिरी दिलासादायक असेल. तिच्या या यशामुळे समाजातील सर्वच स्तरातून तिचे कौतुक यानिमित्ताने होत आहे.