सतेज पाटील यांच्या मदतीला धावून आला गोकुळ संघ

कुरूंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आघाडी धर्माचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी कुरुंदवाड येथे येथील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे भेटीदरम्यान केले.

    कुरुंदवाड : कुरूंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासोबत राहून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आघाडी धर्माचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी कुरुंदवाड येथे येथील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे भेटीदरम्यान केले. यामुळे सतेज पाटील यांच्या विधान परिषद निवडणुकीत गोकुळ संघ धावून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यावेळी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे उपस्थित होते.

    येथील माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक डॉ. सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानी सत्ताधारी नगरसेवकांची बैठक त्यांनी घेतली. यावेळी एका अपक्ष नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विश्वास पाटील यांनी नगरसेवक बापूसो जोग व माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

    गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या भेटीदरम्यान उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, डॉ. सुनील चव्हाण, अक्षरा आलासे फारूक जमादार, शकील गरगरे, बापुसो जोंग, प्रफुल्ल पाटील, महादेव बागलकोटे, शशिकांत तोबरे, नंदू पाटील शिरोली आदी उपस्थित होते.