Google search (7)

या फीचरमध्ये यूजर्सचे गुगल मेसेजिंग फीचर थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीशी लिंक होईल. म्हणजेच यासाठी मोबाईल टॉवरची गरज भासणार नाही. वापरकर्ते Google चे सॅटेलाइट मेसेजिंग टूल वापरून थेट संदेश पाठवू शकतील.

    गुगल आपल्या युझर्ससाठी नवनवीन सुविधा आणतात. आता नुकतंच गुगुलने मेसेजिंग ॲपसाठी (Messaging App) नवीन सॅटेलाइट फीचर (satellite feature) लाँच केले आहे. या फीचरमध्ये यूजर्सचे गुगल मेसेजिंग फीचर थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीशी लिंक होईल. म्हणजेच यासाठी मोबाईल टॉवरची गरज भासणार नाही. त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला इंटरनेट नसतानाही मेसेज पाठवता आणि प्राप्त करता येईल.

    सॅटेलाइट मेसेजिंग फीचर म्हणजे काय जाणून घ्या?

    या फीचरमध्ये यूजर्सचे गुगल मेसेजिंग फीचर थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीशी लिंक होईल. म्हणजेच यासाठी मोबाईल टॉवरची गरज भासणार नाही. वापरकर्ते Google चे सॅटेलाइट मेसेजिंग टूल वापरून थेट संदेश पाठवू शकतील. या फीचरमध्ये फोन सॅटेलाइटशी कनेक्ट होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Google आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI चॅटबॉट जेमिनीच्या एकत्रीकरणासह मेसेजिंग ॲपची बीटा आवृत्ती लॉन्च करणार आहे.

    व्हॉट्सॲपला मिळेल टक्कर

    गुगल सॅटेलाइट मेसेजिंग फीचर आल्यानंतर याची सगळ्यात मोठी स्पर्धा ही सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲपसोबत होणार. याशिवाय, नवीन मेसेजिंग फीचर आयफोनच्या इमर्जन्सी मेसेजिंग फीचरचा अनुभव सुधारू शकतो. यामध्ये यूजर्स त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये उपस्थित असलेल्या कोणत्याही कॉन्टॅक्टशी संपर्क साधू शकतील. मेसेजिंग ॲप इमेज शेअरिंगवर काम करत आहे. Android OS उपग्रह सूचनांशी स्वयं-कनेक्टेड तसेच स्टेटस बारमध्ये उपग्रह चिन्हासह येते.