‘जयंत पाटील आणि सांगलीचे एसपी माझ्या हत्येच्या कटात सामील’; भाजपच्या ‘या’ आमदाराचा आरोप

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) महाविकास आघाडीच्या नेत्यावर अनेक गंभीर आरोप लगावताना दिसून येत आहेत अशातच आता पुन्हा एकदा पाडळकरांनी पालकमंत्री जयंत पाटील तसेच काही पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

    सांगली : राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) महाविकास आघाडीच्या नेत्यावर अनेक गंभीर आरोप लावताना दिसून येत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पडळकरांनी पालकमंत्री जयंत पाटील तसेच काही पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

    भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडिओ ७ नोव्हेंबर २०२१ असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडीओ आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारातला असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पडळकरांनी केला आहे.

    तो हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूनं २०० ते ३०० लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

    गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.