OMG 2 ला ए प्रमाणपत्र देण्यावरुन अभिनेता गोविंद नामदेव भडकले, आदिपुरुषच्या वाह्यात सिनेमाला तुम्ही…

सेन्सॉर बोर्डाने आदिपुरुष सारख्या चित्रपटाला कात्री लावायला हवी होती, जी त्यांनी 'ओह माय गॉड 2' सारख्या वैचारिक आणि प्रगतीशील चित्रपटाला लावली असं गोविंद नामदेव म्हणाले.

    अक्षय कुमारचा चित्रपट ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तथापि, सेन्सॉर बोर्डाने भगवान शिवाच्या भूमिकेवर आणि चित्रपटाची थीम, लैंगिक शिक्षण यावर आक्षेप घेतल्यामुळे याला तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वी 24 कट करण्यात आले आणि त्याला प्रौढ प्रमाणपत्र (A certified) मिळाले. यावरुन अभिनेत गोंविद आंनद (Govind Namdev) यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आदिपुरुष सारख्या वाहयात चित्रपटाला सेन्सॉर करण्यासाठी जे प्रयत्न करायला हवे होते, त्यांनी OMG 2 सारख्या वैचारिकदृष्ट्या प्रगतीशील चित्रपटाला सेन्सॉर करण्यासाठी प्रयत्न केले असं त्यांनी म्हण्टलं आहे.

    काय म्हणाले गोविंद नामदेव

    ‘OMG 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मात्र सेन्सार बोर्डाने या चित्रपटाला  प्रौढ प्रमाणपत्र असल्याचं सर्टिफिकेट दिलं आहे.  यासंदर्भात ‘ओह माय गॉड 2’ अभिनेता गोविंद नामदेव यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रौढ शिक्षणावर आधारित अत्यावश्यक चित्रपटाला अनुचित वागणूक दिल्याबद्दल या पोस्टमध्ये सेन्सॉर बोर्डावर टीका करण्यात आली आहे.  तर, यादरम्यान गोविंदांनी ‘आदिपुरुष’ला टोमणा मारून निरुपयोगी म्हटले.

    गोविंद नामदेव पुढे म्हणाले की, ‘सेन्सॉर बोर्डाने आदिपुरुष सारख्या चित्रपटाला कात्री लावायला हवी होती, जी त्यांनी ‘ओह माय गॉड 2′ सारख्या वैचारिक आणि प्रगतीशील चित्रपटाला लावली. व्वा.’ त्यांनी सेन्सॉर बोर्डाला त्यांनी काय केले यावर चिंतन करण्याची सूचना केली आणि लिहिले, ‘सेन्सॉरने त्यांची चूक सुधारून किमान UA प्रमाणपत्र दिले तर आपल्या समाजातील किशोरवयीन मुलांचे संगोपन अधिक चांगले होईल, हे एक शहाणपणाचे पाऊल ठरेल. एक सकारात्मक क्रांती आमच्यासाठी येऊ शकतात.