ग्रंथदिंडीला आमदारांची दांडी; महापाैरांनी पार पाडले ‘साेपस्कार’

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ िवराजमान झाले आहेत. त्यामुळे या संमेलनावर राष्ट्रवादीचा पगडा असल्याचा आराेप अनेक वेळा विराेधकांनी केला. मात्र सर्वांनाच बराेबर घेऊन साहित्य संमेलन पार पाडणार, असे पालकमंत्र्यांनी वेळाेवेळी सांगून वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.

    नाशिक (Nashik) : साहित्य संमेलनाची घाेषणा झाल्यापासून या ना त्या वादाने सािहत्य संमेलन चर्चेत राहिले. संमेलनाच्या एेन दाेन दिवस आधी नाशिकचे प्रथम नागरिक महापाैर सतीश कुलकर्णी रुसून बसले. भाजपाच्या नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत नसल्याचे कारण देऊन त्यांनी बहिष्कारास्त्र उगारले. अर्थात पालकमंत्र्यांनी त्यांची समजूत काढल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र ग्रंथदिंडीच्या स्थळी महापाैर उशीरा आल्याने चर्चांना उधाण आले हाेते. शहरातील आमदारांनीही ग्रंथदिंडीला दांडी मारल्याने संमेलनात सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही.

    राष्ट्रवादीचा बाेलबाला
    संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ िवराजमान झाले आहेत. त्यामुळे या संमेलनावर राष्ट्रवादीचा पगडा असल्याचा आराेप अनेक वेळा विराेधकांनी केला. मात्र सर्वांनाच बराेबर घेऊन साहित्य संमेलन पार पाडणार, असे पालकमंत्र्यांनी वेळाेवेळी सांगून वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. काल मात्र कार्यक्रमाच्यावेळी ही सुंदाेपसुंदी प्रकर्षाने जाणवली.

    महापाैरांनी पार पाडले ‘कर्तव्य’
    नाशिकचे प्रथम नागरिक या नात्याने महापाैरांना ग्रंथदिंडीला उपसि्थती लावणे भाग हाेते. त्यांनी केलेही तसेच. सकाळी ८ वाजेची वेळ असताना ते साधारण पावणे नऊ वाजेच्या सुमारास कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले अन‌् ग्रंथदिंडी मार्गी लागताच निघालेही. त्यामुळे महापाैरांनी केवळ ‘कर्तव्य’ पार पाडल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली हाेती.

    अखेर राजकारण झालेच!
    साहित्य संमेलन ही एक पर्वणी असते. सािहत्याच्या या कुंभामुळे नाशिकचा नावलाैकिक सर्वदूर जाणार हाेता. शहरातील आमदारांनी साहित्य संमेलनाला निधी दिला मात्र साहित्याच्या या कुंभपर्वात प्रत्यक्ष सहभागी हाेण्याचे टाळल्याने साहित्य संमेलनात अखेर राजकारण झालेच, अशी चर्चा उपसि्थतांमध्ये रंगली हाेती.