171  कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची रक्कम बँक खात्यात जमा; सुधाकर बडगुजर यांच्या प्रयत्नांना यश

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या पाठपुराव्यामुळे पेस्ट कंन्ट्रोलच्या १७१ कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून सात वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रॅज्यूइटीची रक्कम टेत मिळाल्याने त्यांनी बडगुजरांचे आभार मानले.

    सिडको : म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या पाठपुराव्यामुळे पेस्ट कंन्ट्रोलच्या १७१ कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून सात वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रॅज्यूइटीची रक्कम टेत मिळाल्याने त्यांनी बडगुजरांचे आभार मानले.

    महानगरपालिकेने पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासाठी नेमलेले दिग्विजय एंटरप्राइजेस यांच्याकडे १७१ कर्मचारी कार्यरत होते. परंतु, त्यांच्यावरून ग्रॅच्युईटीची रक्कम गेल्या सात वर्षांपासूनन ठेकेदाराकडे अडकली होती. दिग्विजय एंटरप्राईजेस यांनी कर्मचाऱ्यांची देय असलेली ग्रज्युईटीची एकूण रक्कम १,६६,२९,८६४ रुपयांपैकी २० डिसेंबर २०२३ रोजी पहिला हप्ता २३,२९,३७५ रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला.

    पेस्ट कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी उपाध्यक्ष नंदूभाऊ गवळी, रवीभाऊ येडेकर, सोमनाथ कासार तसेच पेस्ट कंन्ट्रोलचे संदीप ढाकणे, मुकेश आहिरे, सचिन पवार, रवी गारे, गुलाम शेख, जमीर शेख, दीपक चव्हाण, अब्दुल शेख, विनोद सोनार, प्रवीण बैसाणे आदींनी परिश्रम घेतले.