शिर्डी नगरपरिषदेला ‘ग्रीन सिग्नल’; मुंबईतील बैठकीत निर्णय

नगरपंचायतीची निवडणुक प्रकिया सुरू आहे. सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी शिर्डी नगरपंचायती ऐवजी नगरपरिषदेसाठी सहा महिण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी याचिका दाखल केली आहे.

    शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क :
    शिर्डी नगरपंचायतीची नगरपरिषद करावी, या शिर्डी ग्रामस्थांच्या भावना योग्य असून नगरपरिषद करण्यासाठीच्या सर्व निकषात शिर्डी शहर बसत असल्याचे राज्य सरकार शिर्डी नगरपरिषद करण्यास सकारात्मक असल्याचे नगरविकास मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिडीर्तील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास सुचित केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश कोते यांनी दिली.

    शिर्डी ग्रामस्थांना नगरपंचायती ऐवजी नगरपरिषद हवी असल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी व ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. शिवाजी गोंदकर यांनी याबाबत राज्य शासनाविरोधात अवमान याचिका ही दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख व अवमान याचिकेची सुनावणी दोन्ही ७ डिसेंबर रोजीच असल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकणे हाच पर्याय उरलेला होता. श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृ्त्वाखी शिडीर्तील सर्वपक्षीय नेत्यांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी (दि.२) मुंबई येथे गेले होते. तेथे राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या शिष्टमंडळाची चर्चा झाली.

    मंत्री म्हणाले!

    शिर्डी नगरपरिषद करण्याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठिवलेला आहे. याबाबतचे नोटिफिकेशन काही दिवसात निघेल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    नगरपरिषदेसाठीच्या सर्व निकषात शिर्डी शहर बसत असल्यामुळे शिर्डी ग्रामस्थाची मागणी व भूमिका योग्य असून राज्य शासन सिर्डी नगरपरिषद करण्यास सकारात्मक आहे. नगरपरिषदे बाबतचे जिल्हाधिकारी यांचे नोटीफिकेशन लवकरच निघणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

    उमेदवारी अर्जच नाही

    नगरपंचायतीची निवडणुक प्रकिया सुरू आहे. सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी शिर्डी नगरपंचायती ऐवजी नगरपरिषदेसाठी सहा महिण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने राज्य शासनास शिर्डी नगरपंचायत रद्द करुन तेथे नगरपरिषद करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य शासनाने नगरपरिषद न केल्यामुळे नगरंपयातीची निवडणूक जाहीर होवून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया चालू झालेले आहे.

    १ डिसेंबरपासून नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मंबई येथे गेलेल्या शिष्टमंडळात रमेश गोंदकर, राजेंद्र गोंदकर, दिपक वारुळे, निलेश कोते यांच्यासह सर्व पक्षिय कार्यकर्ते उपस्थित होते.