डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची शताब्दी जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.

    याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. स्व.दत्ताजीराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पासगोंडा पाटील यांनी, स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक ॲड. प्रमोद वसंत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.

    याप्रसंगी आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आगरचे सरपंच अमोल चव्हाण, माजी आमदार उल्हासदादा पाटील, कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, संचालिका विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगिता पाटील-कोथळीकर, रणजित कदम, महेंद्र बागे, विजय सुर्यवंशी, प्रदिप बनगे, दरगू माने-गावडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील तसेच नांदणी बँकेचे चेअरमन आण्णासाहेब लठ्ठे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जयसिंगपूरचे नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर, मुसा डांगे,नितीन बागे, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार उपस्थित होते.. जन्मशताब्दीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कारखाना आरोग्य केंद्रावर रक्तदान शिबीर आयोजित केले होते.