गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशीही लोकप्रियता,आता बनवली थेट सोन्याची मूर्ती!

156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. ही मूर्ती तयार करण्यासाठी 11 लाख रुपयांच्या सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

    गुजरात : गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांची लोकप्रियता किती आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे. मात्र आता त्यांच्या लोकप्रियतेच एक अनोख उदाहरण गुजरातमध्ये नव्याने पाहायला मिळत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूरतमध्ये चक्क सोन्याची मूर्ती (PM Narendra Modi Gold idol) तयार करण्यात आली आहे. 18 कॅरेट सोन्यापासून ही मूर्ती तयार करण्यात आली  असून  ही मूर्ती तयार करण्यासाठी 11 लाख रुपयांच्या सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

    कुणी बनवली मूर्ती

    सुरतमधील ज्वेलरी तयार करणाऱ्या राधिका चेन्स कंपनीने (Radhika Chains Pvt. Ltd., Mumbai) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं 156 जागांवर विजय मिळवला होता. त्या पार्श्वभूमीवर 156 ग्रॅम वजनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती. सध्या ही मुर्ती सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय ठरली आहे. लोक दुरुन दुरुन ही मुर्ती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात गर्दी करत आहे.

    मूर्ती तयार करण्यासाठी लागले तीन महिने

    मुर्ती तयार करणारे  राजस्थानमधील बोहरा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी चाहता आहे. त्यांना समर्पित करण्यासाठी काहीतरी खास तयार करम्याचा विचार करत होताो. आमच्या कारखान्यात अनेक मूर्त्या तयार केल्या जातात. त्यामुळे मलाही पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती तयार करण्याची आयडिया सूचली. 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. या मूर्तीची अद्याप किंमत ठरलेली नाही. तसेच ही मूर्ती अद्याप विकण्याचा कोणताही विचार नाही. ही मूर्ती तयार करण्यासाठी 11 लाख रुपयांच्या सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

    डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकहाती विजय मिळवला होता. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवला होता. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे, असे राधिका चेन्स कंपनीच्या मालकानं सांगितलं. अनेक लोकांनी ही मूर्ती खरेदी करण्यासाठी उत्साह दर्शवला आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती चर्चेचा विषय आहे. मूर्तीकारांनी ही मूर्ती विकण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.