वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी मागितली माफी, म्हणाले…

माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे बनवले असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं.त्यावरून सर्व स्तरातून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका होत होती. अशातच गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आहे.

    मुंबई : जळगावमधील एका प्रचारसभेत शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. गुलाबराव पाटील यांनी खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांचं नाव वापरत करून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

    दरम्यान त्यावरून सर्व स्तरातून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका होत होती. अशातच गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आहे.

    गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते? 

    माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे बनवले असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं. इथले रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यावरून चांगलाच वाद पेटला होता.

    गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली

    वाद पेटलेला दिसत असताना गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे. माझ्या भाषणातील वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. भाजपकडून विरोध होत असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीकडून देखील गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा निषेध होत होता.

    दरम्यान, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे.