मस्तावलेल्या कारचालकाचा खामल्यात हैदोस; दोन वाहनांना धडक

अनियंत्रित कारने दोन अन्य कारना धडक देत सायकलही चक्काचूर केली. यात सायकलस्वार थोडक्यात बचावला. ही थरारक घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास खामला परिसरात घडली.

    नागपूर (Nagpur) :  अनियंत्रित कारने दोन अन्य कारना धडक देत सायकलही चक्काचूर केली. यात सायकलस्वार थोडक्यात बचावला. ही थरारक घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास खामला परिसरात घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एमएच-४०-सीए-३३८९ क्रमांकाची कार खामला परिसरातून जात होती. कार अभिषेक पांडे हा चालवित होता. त्याने कारचा वेग वाढविला. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. अभिषेकने आधी एमएच-४९-एएस-०३२८ या क्रमांकाच्या कारला धडक दिली. त्यानंतर अन्य एका कारवरही त्याची कार आदळली. अभिषेकने कार बाजूला काढून वेग वाढविला.

    याचदरम्यान सन्नी हा सायकलने जात होता. अभिषेकच्या कारने सन्नीच्या सायकललाही धडक दिली. यात सायकल चक्काचूर झाली. सन्नी थोडक्यात बचावला. या घटनेने खामला चौकात खळबळ उडली. याचवेळी गस्तीवर असलेले पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेतले. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.