शंभर टक्के लसीकरणासाठी कोपरगावात ‘हर घर दस्तक’ अभियान

कोपरगांव तालुक्यात शंभर टक्के कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी २२ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली.

  कोपरगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोपरगांव तालुक्यात शंभर टक्के कोरोना लसीकरण (Vaccination in Kopargaon) व्हावे, यासाठी २२ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे (Vijay Borude) यांनी दिली. अभियान यशस्वी करण्यासाठी तारीखनिहाय लसीकरण मोहीमेची तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर पथक प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.

  असा असेल कार्यक्रम (कंसात पथक प्रमुख)

  २२ नोव्हेंबर- मंजुर, कारवाडी, धामोरी, सांगवी भुसार (गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी)
  २३ नोव्हेंबर- सुरेगांव, कोळपेवाडी, तिळवणी, आपेगांव ( बालविकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक)

  २४  नोव्हेंबर- गोधेगांव, शिरसगांव, ओगदी, अंचलगाव (उपअधीक्षक, भूमीअभिलेख)
  २५ नोव्हेंबर- सोयगांव, रांजणगाव देश, बहादरपुर (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था व पशुवैद्यकीय अधिकारी)

  २६ नोव्हेंबर- संवत्सर व शिंगणापूर (तालुका कृषी अधिकारी व साबा उपअभियंता)
  २७  नोव्हेबर- कोपरगांव शहर (नगरपालिकेचे मुख्याधिकारी)
  २८ नोव्हेंबर- वारी (तालुका आरोग्य अधिकारी)

  लस लाभार्थ्यांची यादी

  आशा स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल, बी.एल.ओ या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अद्याप लस न घेतलेल्या नागरिकांची यांदी तयारी करून घ्यावी. तालुका आरोग्य अधिकारी यांनी या गावांमध्ये किमान ५ लसीकरण पथके तयार ठेवावीत, अशा सूचना तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिल्या आहेत.