अल्पवयीन मुलीशी घरात शिरून अश्लील चाळे; लोकांनी मरेपर्यत मारले

    नागपूर (Nagpur ) : कळमना परिसरात कलेक्शनसाठी घरी गेलेल्या एजंटची नियत फिरली. अकरा वर्षीय मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न त्यानं केला. पण, ती ओरडल्यानं शेजारी जमा झाले आणि त्याला चांगलाच मार खावा लागला.

    कळमन्यात बँकेचा एजंट डेली कलेक्शनसाठी एका घरी गेला. तिथं त्याला अकरा वर्षीय मुलगी दिसली. घरी कुणीच नसल्याच पाहून त्याची नियत फिरली. त्यानं घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पण, ती चिमुरडी ओरडली. शेजारचे लोक जमा झाले. त्यांनी त्या एजंटला चांगलेच धुतले. पोलिसांना बोलावण्यात आले. तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. राजू मानकर असं आरोपीचं नाव आहे.