गोडीगुलाबीने बोलून गुंडाला सोबत नेले आणि एकांकात गळ्यावरून फिरविला चाकू; नागपुरातील हत्येचा थरार

इमरोज याने विरोधी टोळीतील गुंड माऊजर याच्याशी हातमिळवणी केल्याचा संशय शेर खानच्या मनात होता. आपल्या हालचालींची माहिती देऊन आपली हत्या करण्याचा कट रचण्यात इम्मू मदत करत असल्याचाही संशय शेर खानला होता. दरम्यान, सोमवारी रात्री 11 च्या सुमारास इमरोज कुरैशी आपला मित्र शादाब अली याच्यासोबत घराच्या समोर फिरत होता.

    नागपूर (Nagpur) : राज्याच्या उपराजधानीत दिवसेंदिवस हत्येचं सत्र सुरू असताना, आणखी एका हत्येच्या घटनेनं नागपूर हादरलं आहे. उत्तर नागपुरातील एका कुख्यात गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (20 years old man murdered by goon) केली आहे. आरोपीने मृत तरुणाला जबरदस्तीने फिरायला घेऊन जात त्याचा काटा काढला आहे. या प्रकरणी नागपुरातील यशोधरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा (FIR lodged) दाखल केला असून कुख्यात गुंडासह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या (2 Accused arrested) आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

    इमरोज उर्फ इम्मू रसीद कुरैशी असं हत्या झालेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव असून तो हमीद नगरचा रहिवासी होता. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड शेर खान आणि त्याचा साथीदार फरदीन खान याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इमरोज यानं शेर खानच्या दुष्मण टोळीशी हातमिळवणी केली होती. इमरोज दुष्मण टोळीशी हातमिळवणी करून आपल्या हत्येचा कट रचत असल्याच्या संशयातून शेर खाननेच इमरोजचा काटा काढला आहे.

    हमीद नगर परिसरातील रहिवासी असणारा इमरोज गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता. इमरोज याने विरोधी टोळीतील गुंड माऊजर याच्याशी हातमिळवणी केल्याचा संशय शेर खानच्या मनात होता. आपल्या हालचालींची माहिती देऊन आपली हत्या करण्याचा कट रचण्यात इम्मू मदत करत असल्याचाही संशय शेर खानला होता. दरम्यान, सोमवारी रात्री 11 च्या सुमारास इमरोज कुरैशी आपला मित्र शादाब अली याच्यासोबत घराच्या समोर फिरत होता. त्याचवेळी शेर खान आणि त्याचा साथीदार फरदीन खान दुचाकीवरून याठिकाणी आले. त्यांनी इमरोजला सोबत फिरायला येण्याची गळ घातली.

    नको असताना इमरोज आरोपींसोबत फिरायला गेला. निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर आरोपी शेर खाननं इमरोजला धमकावयाला सुरुवात केली. यातून दोघांमध्ये वाद होता, आधीच तयारीत आलेल्या शेर खानने इमरोजच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला. या घटनेची माहिती मिळालेल्यानंतर आलेल्या पोलिसांनी इमरोजला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.