संतापजनक ! मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

मावळमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस तालुका गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे (Balasaheb Rakshe) यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केली आहे.

    वडगाव मावळ : मावळमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस तालुका गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे (Balasaheb Rakshe) यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केली आहे.
    शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना तालुक्याच्या ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी संबंधित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर तालुका गट शिक्षण अधिकारी व पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षणाधिकारी राक्षे यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याला अनुसरून समितीने केलेल्या चौकशीत संबंधित शिक्षक दोषी आढळल्याने त्याविरोधात पुढील कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला करण्यात आली आहे
    दरम्यान, घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कामशेत पोलिसांनी संबंधित शिक्षकावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.