केंद्र सरकारने कान टोचल्यावर राज्य सरकारने देशांतर्गत विमान प्रवाशांच्या चाचणीचा आदेश घेतला मागे, राजेश टोपेंनी केली घोषणा

देशांतर्गत विमान प्रवास करताना RTPCR चाचणी करण्याबाबतचा आदेश(RTPCR Test For Traveling In The Country) आरोग्य विभागाकडून मागे घेतला जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली आहे.

    मुंबई / जालना : केंद्र सरकारच्या ओमायक्रॉन(Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणू उत्परिवर्तनानंतर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना सुधारण्याबाबत राज्याच्या(Central Government Instructions To State Government) आरोग्य विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानंतर देशांतर्गत विमान प्रवास करताना RTPCR चाचणी करण्याबाबतचा आदेश(RTPCR Test For Traveling In The Country) आरोग्य विभागाकडून मागे घेतला जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली आहे.

    केंद्र आणि राज्य यांच्यात आदेशात वेगळेपण राहणार नाही
    जालन्यात बोलताना टोपे म्हणाले की, जोखीम असलेल्या अकरा देशातून आलेल्या प्रवाशांसाठी आल्या बरोबर  RTPCR चाचणी बंधनकारक असून ७ दिवस क्वारंटाईन बंधनकारक आहे. त्यांनतर ७ दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक असून ८ व्या दिवशी पुन्हा RTPCR बंधनकारक आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आदेशात वेगळेपण राहणार नाही असेही ते म्हणाले.

    कायद्याला धरून नसलेले आदेश राज्य सरकार काढत नाही
    टोपे म्हणाले की, राज्य सरकारने केंद्राकडे बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रह धरला आहे.अत्यावश्यक सेवेतील लोक,आरोग्य विभागातील कर्मचारी यांना बूस्टर डोस देण्यात यावा.अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचे ते म्हणाले. लसीकरण नाही तर टॅक्सीतुन प्रवास करता येणार नाही असा कोणताही आदेश राज्य सरकारने काढलेला नाही कायद्याला धरून नसलेले आदेश राज्य सरकार काढत नाही. मात्र लसीकरण करून घेणे ही आपली जबाबदारी असून लोकांना समजावून सांगून लसीकरण केले जात असल्याचे टोपे म्हणाले.