जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस! पुंछ जिल्ह्यात नदीच्या पुरात दोन जवान वाहून गेले

दोन जवान पुंछच्या सुरनकोटमधील पोशाना येथील डोगरा नाला ओलांडत होते, मात्र मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ते वाहून गेले

  देशभरात चांगलाच पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्लीसह (Delhi Rains)अनेक राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जम्मू काश्मीरमध्येही (jammu kashmir) मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याची माहिती समोर येत आहे.  या मुसळधार पावसामुळे पुंछ जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. मात्र, रस्ता ओलांडताना नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

  नदीला आला पूर

  मिळालेल्या माहितीनुसार,  गेल्या काही दिवसापासून पुंछ जिल्हात पाऊस पडतोय.  शनिवारी दोन जवान परिसरात  गस्त घालत असताना दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते जोरदार प्रवाहाच्या वाहून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच  भारतीय लष्कराकडून पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि शोध मोहीम सुरू आहे.

  नायब सुभेदार कुलदीप सिंह गेले वाहून
  वाहून गेलेल्या दोन जवानांपैकी एकाचं नाव नायब सुभेदार कुलदीप सिंह असं आहे. अन्य जवानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांच्याकडून शोध आणि बचाव मोहिस सुरु आहे. कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ लष्कर आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  रस्ता ओलडंताना दुर्घटना

  दोन जवान पुंछच्या सुरनकोटमधील पोशाना येथील डोगरा नाला ओलांडत होते, मात्र मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ते वाहून गेले. पीटीआयने लष्करी अधिकार्‍यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितलं होतं की, लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे संयुक्त पथक दोन्ही बेपत्ता जवानांचा शोध घेत आहेत, पण अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लष्कर आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्यावर लक्ष ठेवलं जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.