हेलिकॉप्टर दुर्घटना : सीडीस जनरल बिपीन रावत यांचं निधन

तमिळनाडू येथील कुन्नूर भागात मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. (Military chopper crashes in Tamil Nadu). लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS बिपीन रावत (CDS Gen Bipin Rawat) हेदेखील या हेलिकॉप्टरमध्ये होते.यात हेलिकॉप्टर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचं पाहायला मिळाले. 

    तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) , त्यांच्या पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकूण ११ जण मृत पावले आहेत.दरम्यान अपघात झाल्यांनतर सीडीएस बिपिन रावत हे जखमी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

    नेमके काय घडले ?
    तमिळनाडू येथील कुन्नूर भागात मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी लष्कराचं एमआय सीरिज हेलिकॉप्टर कोसळलं. (Military chopper crashes in Tamil Nadu). लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS बिपीन रावत (CDS Gen Bipin Rawat) हेदेखील या हेलिकॉप्टरमध्ये होते.यात हेलिकॉप्टर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचं पाहायला मिळाले.  घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं. स्थानिकदेखील मदत करत होते. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी आल्या.बिपीन रावत वेलिंग स्टाफ कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी जात होते.

    अपघाताच्या चौकशीचे आदेश

     

    सीडीएस बिपन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश (Helicopter Crash inquiry ) दिले आहेत.भारतीय हवाई दलाचे एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतही प्रवास करत होते. या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ अपघात झाला आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास करण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत,” असं हवाई दलाने म्हटलं आहे.

    विमान अपघातात निधन झालेले आतापर्यंतच्या प्रमुख व्यक्ती
    – वाय एस राजशेखर रेड्डी
    – अभिनेत्री सौंदर्या
    – माधवराव सिंधिया
    – जीएमसी बालायोगी
    – संजय गांधी
    -मोहनकुमार मंगलम
    – डोरजी खांडू
    – ओपी जिंदाल