बी-टेक विद्यार्थ्याची हायटेक बनावटगिरी; लाखोंची ज्वेलरी खरेदी करुन यूपीआयवर करत होता पेमेंट, पेमेंट सक्सेस झाल्याचा यायचा मेसेज पण..

एका दुकानदाराच्या सीसीटीव्हीत निखिल कैद झाला होता. त्याच्या आधारे निखिलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने गुन्हे कबूल केले आहेत. त्याच्या या कारनाम्यानंतर अजून काही दुकानदारांनी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. निखिलकडून १०५ ग्रॅम सोने, एक स्कूटर आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

  पुणे (Pune):  पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी एका हायटेक चोरट्याला ताब्यात घेतले आहे. हा चोरटा एका एपच्या सहाय्याने ज्वेलर्सच्या दुकानदारांना ठगवित असे. त्याची चोरी करण्याची पद्धतही भारीच होती. तो ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने खरेदी करती असे, त्यानंतर ऑनलीन पेमेंट करी. फोनच्या डिस्प्लेवर पेमेंट ट्रान्सफर झाल्याचा मेसेजही दिसे. मात्र प्रत्यक्षात ज्वेलर्सना ते पैसे मिळतच नसत. त्यांच्या अकाऊंटमध्ये ते पैसे जमाच होत नसत. कुणाला संशय येऊ नये, यासाठी तो पेमेंट, पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेजही स्क्रीनशॉट काढून दुकानातील लोकांना शेअर करीत असे.

  अशा पद्धतीच्या आश्चर्यात टाकणाऱ्या, बनावटगिरी करणाऱ्या चोरट्याचे नाव निखिल सुधीर जैन असल्याची आणि त्याचे वय २२ वर्ष असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे. निखिल हा औरंगाबादेतूल लासूर येथील रहिवासी आहे. पुण्याच्या सिंहगड कॉलेजमध्ये बीटेकच्या तिसऱ्या वर्षात तो शिकत होता. पोलिसांनी त्याला पुण्यानजिकच्या उंड्रे परिसरातून अटक केली आहे, जिथे तो भाड्याने राहत होता.

  कशी करत होता बनावटगिरी
  ज्या ज्वेलरी दुकानातं अधिक गर्दी आहे, त्या दुकांनाना निखिल टार्गेट करीत असे. दागिने खरेदी केल्यानंतर, यूपीआयच्या सहाय्याने पैसे देतो, असे तो सांगत असे. पेमेंट करण्यासाठी तो एका ई कॉमर्स वेबसाईटच्या यूपीआय पेमेंट सर्वहिसचा वापर करीत असे. बार कोड स्कॅन केल्यानंतर, तो तिथे पैसे टाकीत असे, पैशे मिळाल्याचा सक्सेसचा मेसेज दुकानदाराला दाखवून तो तिथून निघून जात असे. दुकानदार मागे लागू नयेत, म्हणून तो २०-३० हजार अशा छोट्या रकमांचेच दागिने नेत असे.

  यूट्यूबवर मिळाली आयडिया
  निखिल हा हुशार विद्यार्थी होता, मात्र तो आपल्या क्रेडिट कार्डचा वापर जास्त करीत होता. त्यामुळे त्याच्यावर अधिक कर्ज वाढले होते. ते देण्यासाठी त्याने एका पेमेंट एपचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याला या एपची माहिती यू ट्यूबवर मिळाली होती. या एपच्या माध्यमातून बनावट व्यवहार करता येणे शक्य होते. ज्यात पैसे गेले असे दिसे, मात्र प्रत्यक्षात ते पैसे दुकानदारांकडे जमाच होत नसत. याच पद्धतीने निखिलने लाखो रुपयांचे दागिने खरेदी केले होते.

  निखिलकडे १० तोळे सोने आणि ५ लाखांचा ऐवज
  एका दुकानदाराच्या सीसीटीव्हीत निखिल कैद झाला होता. त्याच्या आधारे निखिलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने गुन्हे कबूल केले आहेत. त्याच्या या कारनाम्यानंतर अजून काही दुकानदारांनी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. निखिलकडून १०५ ग्रॅम सोने, एक स्कूटर आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यासह त्याच्याकडे पाच लाखांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे. या महागड्या वस्तूही खोट्या पेमेंटने खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे, पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.